जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

दादा सारंग • 02 October 2026, 11:17 AM

भविष्यातील दुष्काळाच्या संभाव्य सावटावर मात करण्यासाठी आणि जलसंवर्धनाला गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ५० वनराई बंधारे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या महाअभियानाचा भव्य शुभारंभ युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज २ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे - गुरव टेंबवाडी येथे संपन्न झाला.

वाढदिवसाचा केवळ औपचारिक उत्सव न साजरा करता जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला आहे. आजच्या शुभारंभप्रसंगी युवा नेते विशाल परब यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून पहिल्या वनराई बंधाऱ्याचे काम करत या अभियानाचा प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी परिसरातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि स्थानिक शेतकऱ्यांसोबत शेताच्या बांधावरच न्याहारीचा आस्वाद घेतला. विशाल परब यांच्या या साधेपणाचे आणि आपुलकीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा नारा सावंतवाडी मतदारसंघातील विविध गावांमध्ये टप्प्याटप्प्याने ५० वनराई बंधारे उभारले जाणार आहेत. या माध्यमातून पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळी वाढवणे आणि उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर ठोस उपाययोजना करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मतदारसंघातील पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने विशाल परब यांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात असून, या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)