जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

गोकुळ दूध संघाच्या विजयाबद्दल सतेज पाटील यांचे अभिनंदन

दादा सारंग • 30 October 2026, 06:53 AM

कोल्हापूर प्रतिनिधी✍️: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीने मिळवलेल्या विजयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. साक्षी समीर वंजारी आणि श्री. समीर वंजारी यांनी सतेज पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले.




गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला मिळालेला विजय हा सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोड मानला जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.




सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेला विश्वास हा विकासाभिमुख राजकारण आणि जनविश्वासाचा विजय असल्याची भावना साक्षी वंजारी यांनी व्यक्त केली. तसेच गोकुळ दूध संघाच्या या यशाबद्दल त्यांनी सतेज पाटील यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




या भेटीदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील काही पदाधिकारीही उपस्थित होते. सहकाराच्या माध्यमातून विकास आणि जनविश्वासाच्या बळावर पुढील वाटचाल करण्यासाठी सतेज पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)