जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

जंगलतोडीविरोधात कर्जत तालुका बंदचे आवाहन

दादा सारंग • 01 November 2026, 10:38 AM

कर्जत प्रतिनिधी✍️: भीमाशंकर आणि साईडोंगर परिसरातील जंगलतोडीच्या निषेधार्थ तसेच टोरेंट प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्जत तालुका बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हे आवाहन करण्यात आले आहे.




छत्रपती शिवाजी महाराज, मावळे आणि क्रांतिकारकांच्या इतिहासाशी जोडलेल्या सह्याद्रीचे संरक्षण करण्याबरोबरच निसर्ग व पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे आवाहनात नमूद करण्यात आले आहे. जंगलतोडीमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम, पुढील पिढीचे भवितव्य आणि कर्जतच्या अस्तित्वाचा प्रश्न याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.




या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील व्यापारी, नागरिक, पर्यावरणप्रेमी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तालुका बंदला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




‘जंगल वाचवा, निसर्ग वाचवा, भविष्य वाचवा’ या घोषणेसह जंगलतोडीविरोधात एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)