जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

कै. नितीन परब यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त २६ नोव्हेंबरला शिरोड्यात भव्य रक्तदान शिबिर!

दादा सारंग • 21 November 2026, 08:20 AM

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: कैलासवासी नितीन परब यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी शिरोडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती निकिता नितीन परब, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, गांधी चौक शिरोडा आणि मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.




हे रक्तदान शिबिर गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा येथे पार पडणार आहे.




रक्तदान हे श्रेष्ठदान असून, एखाद्या गरजू रुग्णाला वेळेवर रक्त उपलब्ध झाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कै. नितीन परब यांच्या स्मृती जपत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.




तरी परिसरातील इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे आणि या सामाजिक कार्याला सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)