सावंतवाडी तालुक्यातील युवा नेते जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी माजगाव जिल्हा परिषद सदस्य म्हणून संधी मिळाल्या नंतर मतदार संघात मोठ्या प्रमाणात कामे केली असून आता त्यांनी नागरी सुविधा विकास कामांच्या दृष्टीने १५ व्या वित्त आयोगांतर्गत आपल्या माजगाव ग्रामपंचायत क्षेत्रात तब्बल 45 लाखाचा भरघोस निधी विविध विकास कामांसाठी मंजूर करून आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून संधी मिळाल्या नंतर आणू शकलो व गावचा विकास करू शकतो. विक्रात सावंत यांचे ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आभार मानत ग्रामपंचायत सभेमध्ये अभिनंदन करण्यात आले.