जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

नगरोत्थानमधून १० लाख रूपयांचा २०० केव्ही ट्रान्स्फार्मर सावंतवाडी नगरपरिषद हद्दीत मंजूर

दादा सारंग • 14 October 2026, 06:34 AM

सावंतवाडी प्रतिनिधी ✍️: माजी मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून नगरोत्थानमधून १० लाख रूपयांचा २०० केव्ही ट्रान्स्फार्मर सावंतवाडी नगरपरिषद हद्दीत मच्छिमार्केटजवळ मंजूर करण्यात आला होता याचा शुभारंभ आज शिवसेना नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आला.आम. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झाला असून प्रभाग ६ साठी त्यांनी भरघोस निधी दिला आहे.यासाठी त्यांचे आभार मानत नळपाणी आणि गॅस पाईपलाईनच काम देखील ज्याठिकाणी पूर्ण झालं आहे त्याठिकाणी लवकरच हे रस्ते पुर्ववत होणार आहेत तसेच प्रभागातील सर्व गटारे,नाले बांधून बंदिस्त करणे व सोलर हायमास्ट, गल्ली मध्ये सर्वत्र ठिकाणी पथदिवे लावून परिसर प्रकाशमय होणार आहे यासाठी आमदार दीपकभाई केसरकर यांनी भरघोस निधी उपलब्ध केला आहे.यावेळी ज्येष्ठ नागरिक सत्कार बुक स्टॉल मालक श्री.विश्वनाथ पेडणेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ केला याप्रसंगी गटनेते बाबु कुडतरकर, शिवसेना महिला शहरप्रमुख भारती मोरे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, सीमा नाईक, ॲड. सायली दुभाषी, कळसुलकर हायस्कूल अध्यक्ष शेलेश पई,अभियंता वीणा मठकर, न.प. अधिकारी गौरव बुगड, संतोष गांवस, श्रेयस मुंज,गणेश कुडव, सागर मठकर,अक्षय शिरवलकर,वसंत सावंत, विशाल लाड,गौतम सावंत, राजेश पवार, विद्युत विभाग कंत्राटदार गौरेश सावंत,भास्कर आमुणेकर आदी उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)