जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

नाशिकच्या गोदातीरावर दिव्य गोदा महाआरतीने सिंहस्थ महाकुंभाचा शुभारंभ

दादा सारंग • 01 November 2026, 05:03 AM

नाशिक प्रतिनिधी✍️: सिंहस्थ महाकुंभाच्या पवित्र शुभारंभानिमित्त नाशिक येथील गोदावरी नदीच्या तीरावर भव्य ‘गोदा महाआरती’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पूजनीय साधू-संतांच्या उपस्थितीत गोदामातेची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली.




हजारो दीपांनी उजळून निघालेला गोदाघाट, मंत्रोच्चारांचा गजर आणि शंखनादाने भारावलेले वातावरण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या सोहळ्यात सहभागी झालेल्या मान्यवरांनी गोदामातेची आरती करून महाराष्ट्रासह देशातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.




या दिव्य सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही सहभाग घेतला. गोदातीरावर झालेली महाआरती ही श्रद्धा, संस्कृती आणि सनातन परंपरेचे दर्शन घडविणारी ठरली.




सिंहस्थ महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महाआरतीमुळे नाशिकच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला विशेष अधोरेखित करण्यात आले. हजारो दीपांच्या प्रकाशात आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झालेल्या या सोहळ्याने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक अनुभूती दिली.




गोदामातेच्या चरणी महाराष्ट्र, देश आणि समस्त जनतेवर सदैव कृपादृष्टी राहावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. सिंहस्थ महाकुंभाच्या शुभारंभाचा हा सोहळा भक्ती, श्रद्धा आणि सनातन संस्कृतीच्या जागराचा अनुभव देणारा ठरला.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)