जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
तंत्रज्ञान

नाशिकमध्ये ५०१ जणांचा एकाच वेळी शंखनाद

दादा सारंग • 29 October 2026, 04:59 AM

नाशिक प्रतिनिधी✍️: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या तीरावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य शंखनाद सोहळ्याने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या उपक्रमात ५०१ जणांनी एकाच वेळी शंखनाद करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली.

सहभागींनी तब्बल ५ मिनिटे ३० सेकंद एकसुरात शंख वाजवत हा विक्रम साकारला. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला आधुनिक विश्वविक्रमाची जोड देणाऱ्या या उपक्रमामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यापूर्वी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे २०१९ मध्ये ३०३ जणांनी एकत्रित शंखनाद करण्याचा विक्रम केला होता. नाशिकमध्ये ५०१ जणांनी एकाच वेळी शंखनाद करून हा विक्रम मागे टाकला.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अनोख्या उपक्रमामुळे गोदावरीचा तीर शंखनादाने दुमदुमून गेला. धार्मिक परंपरा, सामूहिक सहभाग आणि विश्वविक्रमाचा संगम घडवून आणणारा हा सोहळा नाशिकच्या इतिहासात विशेष ठरणार आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)