जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा

दादा सारंग • 25 November 2026, 06:11 PM

सावंतवाडी प्रतिनिधी✍️: येथील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या जत्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सजावटीमुळे मंदिर परिसराला विशेष प्रसन्न आणि मंगलमय स्वरूप प्राप्त झाले होते.




जत्रोत्सवानिमित्त सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देवीची ओटी भरणे, नवस फेडणे तसेच देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती.दुपार नंतर भाविकांची मोठी गर्दी झाली व दर्शनास तब्बल दोन ते तीन तास लागले.सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा आणि इतर भागांतूनही असंख्य भाविकांनी सोनुर्ली येथे येत श्रीदेवी माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले.




दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. भाविकांची वाढती गर्दी, देवीवरील अपार श्रद्धा आणि पारंपरिक धार्मिक विधींमुळे जत्रोत्सवाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)