जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत नतमस्तक

दादा सारंग • 25 November 2026, 04:12 PM

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीच्या भव्य जत्रोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजगाव मतदारसंघाचे सदस्य तथा सावंतवाडी तालुक्यातील युवा नेते विक्रांत सावंत यांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले.




यावेळी त्यांनी श्रीदेवी माऊलीच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. कोकणातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या या जत्रोत्सवात सहभागी होत त्यांनी देवीप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. माऊलीचा आशीर्वाद सर्व भाविकांवर सदैव राहावा, प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.




सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीवरील अपार श्रद्धा आणि जत्रोत्सवाच्या निमित्ताने लाभलेले दर्शन यामुळे परिसरातील भक्तिमय वातावरणात विक्रांत सावंत यांनीही सहभाग नोंदविला.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)