जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी इस्माईल शेख यांची निवड

दादा सारंग • 16 October 2026, 12:45 PM

कुडाळ प्रतिनिधी ✍️: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विचार विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी इस्माईल युनूस शेख यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅप्टन प्रवीण डावर यांच्या मान्यतेनुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभागाचे अध्यक्ष सय्यद खलील सैफ यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.या नियुक्तीद्वारे पक्षाची विचारसरणी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत व प्रभावी करण्याची महत्त्वाची जबाबदारी शेख यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांना तात्काळ पदभार स्वीकारून संघटनात्मक कामकाज गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इस्माईल युनूस शेख यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विलास गावडे, कुडाळ तालुका अध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभु, प्रदेश सदस्य प्रकाश जैतापकर आणि बँक संचालक प्रसाद बांदेकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेख यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)