जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

दादा सारंग • 26 November 2026, 12:00 PM

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा बुधवारी सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




पक्ष संघटना वाढविण्यासाठी आतापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन संबंधित पदाधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांमुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात अधिक जोमाने कामाला लागावे. सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.




नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये सावंतवाडी शहरप्रमुखपदी देवेंद्र टेमकर, सावंतवाडी तालुका महिला उपजिल्हा संघटकपदी सीमा मठकर, सावंतवाडी तालुका डीजी कक्ष समन्वयकपदी अशोक धुरी, उपतालुका प्रमुख (सावंतवाडी शहर) म्हणून शैलेश गवंडळकर, उपतालुका प्रमुख (माजगाव, तळवडे जिल्हा परिषद) म्हणून प्रमोद सावंत, सावंतवाडी अल्पसंख्याक तालुका संघटकपदी नियाज शेख, सावंतवाडी शहर संघटकपदी संदीप वेंगुर्लेकर, तर उपविभाग प्रमुख (मळेवाड पंचायत समिती) म्हणून दीपक बाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, सावंतवाडी तालुकाप्रमुख राजू शेटकर, तालुका संघटक निशांत तोरस्कर, कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)