वेंगुर्ला शिवसेना उपतालुकाप्रमुख पदी चिपी गावचे सुपुत्र भिकाजी उर्फ तात्या पवार यांची निवड सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजु परब यांनी वेंगुर्ला तालुका पक्ष कार्यालयात आयोजित मासिक सभेत नियुक्ती पत्र देऊन अधिकृत निवड केली.आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपली निवड झाली असून मी सुद्धा माझ्या पदाचा योग्य वापर करून आपला शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी काम करत राहणार असल्याचे यावेळी तात्या पवार यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले.यावेळी जिल्हा प्रमुख संजु परब तालुका प्रमुख बाळा दळवी उपजिल्हा प्रमुख सिद्धेश परब युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे सुचित्रा वजराटकर सत्यवान साटेलकर आदी पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.