जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

दोडामार्ग शेतकऱ्यांचे अखेर उपोषण मागे

दादा सारंग • 03 October 2026, 11:59 AM

दोडामार्ग तालुक्यात वाढलेल्या वन्यहत्तींच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेले उपोषण अखेर २ ऑक्टोबर रात्री उशिरा मागे घेण्यात आले. वन्यप्राणी हटवा कृती समिती आणि हत्तीबाधित शेतकऱ्यांनी हत्ती हटाव मोहीम राबविण्यासह वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

दोडामार्गचे वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या चर्चेचा संदर्भ देत उपोषणकर्त्यांना पत्र दिले. शासन स्तरावर हत्ती हटावाबाबत प्रयत्न सुरू असून, आजरा-घाटगर परिसरात हत्ती ग्राम उभारणीचे काम सुरू आहे. तसेच तिलारी खोऱ्यात हत्तींसाठी खाद्य निर्मितीचे काम सुरू असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

तसेच येत्या १५ दिवसांत वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हत्तींच्या प्रश्नावर ठोस तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिल्याचे वन विभागाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)