वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : दिवाळी सणाच्या मंगलमय पर्वानिमित्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिवसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांची सावंतवाडी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी आमदार केसरकर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. सणाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत वेंगुर्ला तालुक्यातील विविध प्रश्न, स्थानिक विकासकामे तसेच संघटनात्मक विषयांवरही चर्चा करण्यात आली.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.