जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

वेंगुर्ला शहरात २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान ई-कचरा संकलन अभियान

दादा सारंग • 28 October 2026, 02:28 AM

वेंगुर्ला स्वरूपा सौदागर✍️: वेंगुर्ला नगर परिषद, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात २८ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. घरांमध्ये पडून असलेला वापरात नसलेला इलेक्ट्रॉनिक कचरा योग्य पद्धतीने संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने हे अभियान आयोजित करण्यात आले आहे.




या अभियानासाठी शहरात चार ठिकाणी संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्रे २८, २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत.




नागरिकांनी घरात वापरात नसलेले जुने मोबाईल फोन, चार्जर, केबल्स, इअरफोन, कीबोर्ड, माऊस, संगणकाचे सुटे भाग, जुने रिमोट, खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच अन्य ई-कचरा आपल्या जवळच्या संकलन केंद्रावर जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




ई-कचरा संकलन केंद्रे :




- हॉस्पिटल नाका, वेंगुर्ला

- दाभोली नाका, वेंगुर्ला

- वेंगुर्ला नगर परिषद कार्यालय

- घोडेबाव गार्डन, वेंगुर्ला




शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन घरातील ई-कचरा संकलन केंद्रावर जमा करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




अधिक माहितीसाठी संपर्क : ९१७५००७०८७

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)