वेंगुर्ला प्रतिनिधी ✍️: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले कॅम्पातल्या बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्र इथं 'आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल निर्मित आणि प्रस्तुत' अभिवाचन अनुभव कार्यक्रम 'उत्तरचंद्राची कोजागिरी' चा प्रयोग कला व संस्कृती रसिकांच्या खचाखच उपस्थितीत सादर झाला. लेखिका वैशाली पंडित यांची संकल्पना आणि लेखन असलेल्या या कार्यक्रमाचा प्रयोग रविवारी ११ ऑक्टोबर २०२६ ला सादर करण्यात आला. मुक्तांगण महिला मंच वेंगुर्ला,ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्ला आणि सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशन वेंगुर्ला यांनी निमंत्रित केलेल्या ह्या प्रयोगाला वेंगुर्ला तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर रसिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शुभारंभापूर्वी बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्र, वेंगुर्ला यांच्या प्रांगणातील बॅरिस्टर नाथ पै यांच्या प्रतिमेला अध्यक्ष ॲड देवदत्त परुळेकर व मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
या नंतर सभागृहात,आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या वतीने उपसंपादक देवेंद्र गावडे यांनी उपस्थित मान्यवर श्रोत्यांचे स्वागत केले.
उत्तरचंद्राची कोजागिरीचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी उपस्थित रसिकांच्या वतीनं दिवंगत अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
उत्तरचंद्राची कोजागिरी कार्यक्रम संचात आजी - वैशाली पंडित,आजोबा - संजय शिंदे, सूत्रधार - अक्षय सातार्डेकर, सहकलाकार - तन्वी पाटकर, तालवाद्य - वैभव मांजरेकर आणि संगीत संयोजक - विरेश वळंजू या कलावंतांचा सहभाग होता. कलाकारांचे प्रभावी सादरीकरण, संवादातील भावस्पर्शीपणा, संगीताची योग्य सांगड आणि तालवाद्याची समर्पक साथ यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली अशी उपस्थितांनी प्रशंसा केली. दशावतार कलेइतकाच जिवंतपणा ह्या 'उत्तरचंद्राची कोजागिरी' सादरीकरणात अनुभवला अशी प्रतिक्रिया उपस्थितांच्यावतीने व्यक्त करण्यात आली.
या प्रयोगाला ॲड.देवदत्त परुळेकर,मुक्तांगण महिला मंच अध्यक्ष मंगल परुळेकर, सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशन अध्यक्ष तथा माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर,वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्रकाश रेगे,आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या सहसंपादक सानिका वायंगणकर, उपसंपादक देवेंद्र गावडे, नाट्यकर्मी बाळू खामकर,सुनील नांदोसकर,वेंगुर्ला तालुका निवृत्त शिक्षक सत्यवान पेडणेकर, कैवल्य पवार,दिलीप प्रभुखानोलकर,सदानंद तावडे, दिव्या आजगावकर,त्रिंबक आजगावकर,देवयानी आजगावकर,स्मिता नाईक, सीमा मराठे,शशांक मराठे, पत्रकार महेंद्र मातोंडकर,मधुरा आठलेकर,भैय्या गुरव,दिव्यश्री पाटकर,युवा कलाकर्मी साई आजगावकर,विश्वास वाघाटे यांच्यासह वेंगुर्ला तालुक्यातील शिक्षक,नाट्यकर्मी मान्यवर रसिकांची आणि विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती.मान्यवरांनी ह्या कार्यक्रमाची विशेष प्रशंसा केली. हा प्रयोग आता अनेक ठिकाणी सादर केला जाईलच असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त करण्यात आला.लेखिका वैशाली पंडित यांच्या संकल्पनेसह संहिता लेखनाची व संपूर्ण संचाच्या उत्तरोत्तर रंगलेल्या सहज सादरीकरणाची विशेष प्रशंसा करण्यात आली.तसेच उत्तरचंद्राची कोजागिरी अभिवाचन अनुभव असे प्रयोग सादर होण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त ठिकाणी प्रयोगाचे आयोजन करावे,असे आवाहनही मान्यवर रसिकांच्या वतीनं करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक समन्वयक त्रिंबक आजगावकर व सौ.देवयानी आजगावकर यांनी घेतलेल्या विशेष पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले.तसेच मुक्तांगण महिला मंच वेंगुर्ला,ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्ला आणि सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशन वेंगुर्ला यांच्या सुनियोजनबद्ध आयोजनाबद्दलही समाधान व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला भानू मांजरेकर यांचे ध्वनी व्यवस्थापन तर प्रेमानंद जाधव यांचे सभागृह व्यवस्थापन तसेच श्री व सौ माईणकर दांपत्याचे सहकार्य लाभले.
यावेळी आयोजकांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, संजय शिंदे,अक्षय सातार्डेकर, वैभव मांजरेकर,विरेश वळंजू या कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.तसेच ॲड.देवदत्त परुळेकर यांचा वैशाली पंडित यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
उत्तरचंद्राची कोजागिरी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केलेले सुप्रसिद्ध सायकलस्वार, गिर्यारोहक,जलतरणपटू आणि जगातील २४ देशांत आंतरराष्ट्रीय सायकल मोहिमेचा उपक्रम करणारे असे गिरिमित्र गिर्यारोहक पुरस्कार विजेते सतीश आंबेरकर यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.