वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावचे दशावतार कलाकार सिताराम उर्फ चंदू मिशाळे यांचे २८ सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले ते दशावतार क्षेत्रात स्त्री भुमिका म्हणून काम करत होते.तसेच त्यांचे दाभोली तिठा येते वडापाव चे छोटेसे दुकान होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी, मुलगा, बहीण,भावजय असा परिवार आहे.दाभोली ग्रामपंचायत सदस्य शामल मिशाळे यांचे पती तर वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य शितल राऊत व दाभोली ग्रामपंचायत सदस्य अवधूत राऊत यांचे मामा होत.मिशाळे यांच्या जाण्याने दाभोली पंचकोशीत व दशावतार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.