जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

आडाळी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा घ्या!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आडाळी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा घ्या!
“

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी; संजू परब यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली भेट

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : आडाळी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय प्रक्रिया, ऑनलाइन व ऑफलाइन कार्यपद्धतींची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली आडाळीचे सरपंच पराग गावकर, प्रशांत जाधव आणि बाबा धुरी यांनी उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.


उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागत आहेत. गेल्या वर्षभरापासून रखडलेली भूखंड वाटप प्रक्रिया तसेच अन्य प्रशासकीय अडचणी दूर झाल्याने ६० हून अधिक उद्योजकांनी प्रत्यक्ष उद्योग उभारणीच्या दिशेने पावले उचलली आहेत.


मात्र, या औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश भूखंडधारक उद्योजक हे गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या महामंडळाच्या विविध ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रियांची पुरेशी माहिती नसल्याने उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रक्रियेत त्यांचा वेळ खर्च होत असून, प्रत्यक्ष उद्योग उभारणीसही विलंब होत आहे.


उद्योजकांना महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, ऑनलाइन व ऑफलाइन कार्यपद्धती याबाबत एकाच ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन मिळाल्यास उद्योग उभारणीच्या कामाला गती मिळू शकते. तसेच प्रशासकीय प्रक्रियेबाबत असलेला संभ्रम दूर होऊन महामंडळाच्या कामकाजाबाबत उद्योजकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


त्यामुळे आडाळी औद्योगिक क्षेत्रातील सर्व भूखंडधारक उद्योजकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याबाबत संबंधित प्रशासनाला आवश्यक सूचना द्याव्यात, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रुप ग्रामपंचायत आडाळी आणि आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास समिती यांच्याकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही निवेदनातून देण्यात आली आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT