जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

दाभोली ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधारा बांधला

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

दाभोली ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधारा बांधला
“

जिल्हाधिकारी‌ .मा.तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली येथील बोवलेकरवाडी व नागडेवाडी परिसरातील सजग नागरिकांनी एकत्र येत श्रमदानातून येथील नदीवर कच्चा बंधारा बांधला.यात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.गावातील पाणी उपलब्धता वाढविण्यासोबतच पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर अडवून ठेवणे,भूजलपातळी वाढविणे तसेच आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे,हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून बंधाऱ्याचे काम पूर्ण केले.कमी पाऊस आणि संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या स्थानिक जलसंधारणाच्या उपाययोजना जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.येथील नागरिकांनी दाखविलेला हा सामूहिक सहभाग आदर्श व प्रेरणादायी ठरणारा आहे.‘पाणी अडवा,पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत ग्रामस्थांनी बंधाऱ्याचे काम केले.यावेळी 'नाम फाउंडेशन' च्या माध्यमातून महाराष्ट्रात निस्वार्थीपणे काम केलेल्या नाना पाटेकर यांच्या योगदानाची आठवण ठेवत दाभोली ग्रामस्थांतर्फे प्रत्यक्ष श्रमदानातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी‌ .मा.तृप्ती धोडमिसे, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, सभापती शंकर घारे,उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर,शितल राऊत बांदवलकर, सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच,ग्रामसेवक, तलाठी,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी श्रमदान केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा
सामाजिक

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी
सांस्कृतिक

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी

तुळशी विवाह : भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा पवित्र सोहळा!
सांस्कृतिक

तुळशी विवाह : भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा पवित्र सोहळा!

ANCHOR AD SLOT