जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

११२ भजन मंडळांचा निधी अखर्चित राहून परत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

११२ भजन मंडळांचा निधी अखर्चित राहून परत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन!
“

वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली टाळ-मृदंगाच्या गजरात निषेध; निधी पुन्हा उपलब्ध न झाल्यास भजनी कलाकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा इशारा

सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : जिल्ह्यातील ११२ भजन मंडळांसाठी भजन साहित्य खरेदीकरिता मंजूर करण्यात आलेला निधी जिल्हा परिषदेकडून खर्च न झाल्याने परत गेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करूनही अनेक भजन मंडळांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर धडक दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर टाळांच्या गजरात भजन सादर करत अनोखे भजन आंदोलन करण्यात आले.




सत्ताधाऱ्यांनी मोठ्या गाजावाजात जिल्ह्यातील भजन मंडळांसाठी भजन साहित्य वाटपाची योजना जाहीर केली होती. या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील शेकडो भजन मंडळांनी अर्जही दाखल केले होते. मात्र, जिल्हा परिषदेकडून मंजूर झालेला निधी वेळेत खर्च न झाल्याने ११२ भजन मंडळांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. निधी अखर्चित राहून परत जाणे ही जिल्ह्यातील भजन मंडळांची मोठी निराशा करणारी बाब असून, यामुळे सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.




भजन ही कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून, अनेक भजन मंडळे या योजनेच्या माध्यमातून साहित्य मिळण्याच्या अपेक्षेत होती. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाअभावी त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.




भजन मंडळांसाठीचा निधी पुन्हा उपलब्ध करून देऊन संबंधित मंडळांना भजन साहित्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा जिल्ह्यातील भजनी कलाकारांना सोबत घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा वैभव नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.




या आंदोलनावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, पंचायत समिती सदस्य तथा गटनेते योगेश धुरी, ओरोस विभागप्रमुख रवीबुवा कदम, कसाल शहरप्रमुख नंदू आंबेरकर, ओरोस शहरप्रमुख भगवान परब, कळसुली विभागप्रमुख बबली राणे, बंड्या कोरगावकर, गणेश मेस्त्री, बाळू पालव, रवी परब, मामा ओरोसकर, निलेश परब, अमित राणे, सदाशिव पालव आदी शिवसैनिक उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे
सामाजिक

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे

शरीरसौष्ठव क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण उर्फ दादा बोवलेकर काळाच्या पडद्याआड
सामाजिक

शरीरसौष्ठव क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण उर्फ दादा बोवलेकर काळाच्या पडद्याआड

बाळासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान करणाऱ्यांनी आधी त्यांच्या विचारांचा आदर करावा  साक्षी वंजारी
राजकीय

बाळासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान करणाऱ्यांनी आधी त्यांच्या विचारांचा आदर करावा साक्षी वंजारी

ANCHOR AD SLOT