जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे
“

कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; विविध गटांत ७७ वैज्ञानिक प्रतिकृतींचे सादरीकरण

कुडाळ प्रतिनिधी✍️ : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याबरोबरच त्यांच्या अंगी असलेल्या संशोधनवृत्तीला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यात विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विद्यार्थ्यांनी अशा प्रदर्शनांतून प्रेरणा घेऊन भविष्यात संशोधक बनण्याचे ध्येय ठेवावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विज्ञान संशोधन केंद्र अर्थात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली.




कुडाळ पंचायत समिती, शिक्षण विभाग, तालुका विज्ञान मंडळ आणि बिबवणे येथील लक्ष्मीनारायण विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. बिबवणे येथील लक्ष्मीनारायण विद्यालयात २६ आणि २७ नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.




या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून ५०, माध्यमिक गटातून २२, तर शिक्षक शैक्षणिक साधन गटातून ५ अशा एकूण ७७ वैज्ञानिक प्रतिकृती विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सादर केल्या आहेत.




उद्घाटनप्रसंगी आमदार निलेश राणे यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृतींचे कौतुक केले. मानवी जीवनामध्ये विज्ञानाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून सकारात्मक वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भविष्यात नवनवीन संशोधक निर्माण व्हावेत, यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.




या कार्यक्रमाला कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक, संजू परब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल, शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, उपसभापती सिताराम तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील, नागेश आईर, रूपेश कानडे, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, निखिल कांदळगावकर, अर्चना घावनळकर, बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजाराम सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र मेस्त्री, सरपंच सृष्टी कुडपकर, उपसरपंच दीपक सावंत आणि गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.




यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाराम सावंत आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर पारधी यांच्या हस्ते आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आमदार राणे यांनी प्रदर्शनातील विविध वैज्ञानिक प्रतिकृतींची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रयोगांची माहिती जाणून घेतली आणि त्यांच्या कल्पकतेचे विशेष कौतुक केले.




कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीत आणि ईशस्तवनाने झाली. गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत यांनी प्रास्ताविक केले. अंकुश कदम यांनी सूत्रसंचालन केले, तर मुख्याध्यापक भास्कर पारधी यांनी उपस्थितांचे आभार मानले. दोन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!
प्रशासन

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार
राजकीय

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!
प्रशासन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक
सांस्कृतिक

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक

ANCHOR AD SLOT