जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
“

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नियुक्ती जाहीर; रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातून अभिनंदनाचा वर्षाव

रत्नागिरी प्रतिनिधी✍️ : भारतीय जनता पक्षाने रत्नागिरीतील युवा नेतृत्व डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तीमुळे रत्नागिरीच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, कोकणातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




बूथ प्रमुख म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या डॉ. केळकर यांनी आजवर पक्ष संघटनेत विविध पदांवर काम केले आहे. भाजप युवा मोर्चाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष तसेच भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. संघटनात्मक कामाचा अनुभव, कार्यकर्त्यांशी असलेला संवाद आणि पक्षवाढीसाठी घेतलेला पुढाकार यामुळे त्यांनी जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.




राजकीय कार्यासोबतच डॉ. केळकर सामाजिक क्षेत्रातही सातत्याने सक्रिय आहेत. युवक, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील गरजू रुग्णांच्या विविध समस्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. जे. एस. केळकर मेमोरियल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते कार्यरत असून, या संस्थेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ, वैद्यकीय सुविधा आणि विविध प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.




त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या 'माय भारत' या स्वायत्त संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा शासकीय सल्लागार समितीवर त्यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.




डॉ. ऋषिकेश केळकर यांना सार्वजनिक कार्याचा समृद्ध वारसा लाभला आहे. रत्नागिरीचे पहिले थेट निवडून आलेले नगराध्यक्ष आणि सुमारे १२ वर्षे नगराध्यक्षपद भूषविणारे डॉ. ज. शं. केळकर यांचे ते नातू आहेत. मात्र, या वारशाच्या बळावर न राहता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील स्वतःच्या कामातून स्वतंत्र ओळख निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.




महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, आरोग्यसेवक आणि इतर संबंधित घटकांना पक्षाच्या संघटनात्मक प्रवाहाशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. तसेच वैद्यकीय आघाडीची संपूर्ण महाराष्ट्रात मजबूत संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्धारही डॉ. केळकर यांनी व्यक्त केला आहे.




या नियुक्तीबद्दल त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांचे विशेष आभार मानले आहेत.




रत्नागिरीतील युवा नेतृत्वाला आता राज्यस्तरावर संघटनात्मक काम करण्याची संधी मिळाली असून, डॉ. ऋषिकेश केळकर यांच्या या नियुक्तीचे राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून स्वागत होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!
प्रशासन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक
सांस्कृतिक

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक

११२ भजन मंडळांचा निधी अखर्चित राहून परत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन!
सामाजिक

११२ भजन मंडळांचा निधी अखर्चित राहून परत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन!

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
सामाजिक

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

ANCHOR AD SLOT