जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

जिल्हा परिषदेत प्रशासन-सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव; जनतेच्या प्रश्नांसाठी अपक्ष म्हणून लढणार : रुपेश पावसकर

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

जिल्हा परिषदेत प्रशासन-सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव; जनतेच्या प्रश्नांसाठी अपक्ष म्हणून लढणार : रुपेश पावसकर
“

विकासकामांतील दिरंगाईवरून प्रशासनाला धारेवर धरणार; गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा

कुडाळ प्रतिनिधी✍️ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यात समन्वय नसल्याने सर्वसामान्य जनतेशी संबंधित विकासकामे रखडत आहेत. सभांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होऊन ठराव मंजूर केले जातात; मात्र प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. हा प्रकार बदलण्यासाठी आपण अपक्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे लढणार असल्याचा निर्धार रुपेश पावसकर यांनी व्यक्त केला.




सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगत पावसकर म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर जनतेची कामे मार्गी लावणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यातच एकमत नसल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नसून अपक्ष म्हणून निवडून आलो आहोत. त्यामुळे आपली बांधिलकी केवळ जनतेशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




रेन हार्वेस्टिंगच्या ३ कोटी ६० लाख रुपयांच्या कामाबाबत तसेच जिल्ह्यातील ११२ भजनी मंडळांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत अद्याप स्पष्टता का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हे विषय राजकीय नसून गावाच्या आणि जनतेच्या विकासाशी निगडित आहेत. त्यामुळे प्रशासनाने मनमानी कारभार न करता या विषयांवर आपली स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.




जनहिताची आणि विकासाची चांगली कामे असतील तर त्यांना आपला निश्चितच पाठिंबा राहील. मात्र, चुकीच्या कामांबाबत प्रशासनाला जाब विचारण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही. जनतेने आपल्याला कोणाच्याही दबावाखाली काम करण्यासाठी नव्हे, तर निर्भीडपणे त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अपक्ष म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सभेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत राहणार असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले.




दरम्यान, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करावे. अन्यथा जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा एल्गार पुकारावा लागेल, असा इशाराही रुपेश पावसकर यांनी दिला.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!
प्रशासन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक
सांस्कृतिक

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक

११२ भजन मंडळांचा निधी अखर्चित राहून परत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन!
सामाजिक

११२ भजन मंडळांचा निधी अखर्चित राहून परत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन!

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
सामाजिक

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

ANCHOR AD SLOT