जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी
“

श्री देवी सातेरी व श्री देव गिरोबा बारापंचायतनच्या जत्रोत्सवानिमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: येथील श्री देवी सातेरी गिरोबा बारापंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी श्री देवी सातेरी जत्रोत्सव, तर शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी श्री देव गिरोबा जत्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे.




जत्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी दर्शनाची पर्वणी लाभणार असून, धार्मिक परंपरेबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी अनुभवता येणार आहे.




बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी श्री देवी सातेरी मंदिर येथे खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. तर शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी श्री देव गिरोबा मंदिर येथे मामा मोचेमाडकर यांच्या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.




दोन्ही जत्रोत्सवांच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण होणार असून, दाभोलीसह पंचक्रोशीतील भाविक, ग्रामस्थ आणि चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT