जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर १० नोव्हेंबरला भव्य दीपोत्सव; अभिनव फाउंडेशनचा उपक्रम

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर १० नोव्हेंबरला भव्य दीपोत्सव; अभिनव फाउंडेशनचा उपक्रम
“

दीपमाळांच्या रोषणाईने मोती तलाव उजळणार; सांस्कृतिक कार्यक्रमांसह सेल्फी पॉईंटचे खास आकर्षण

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : दीपावलीच्या सणाचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतवाडीतील ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता या दीपोत्सवाचा शुभारंभ होणार असून, दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशात मोती तलावाचा परिसर उजळून निघणार आहे.




या दीपोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे नागरिकांसाठी तयार करण्यात येणारा ‘दीपावली शुभेच्छा सेल्फी पॉईंट’. या माध्यमातून नागरिकांना दीपावलीच्या आनंददायी क्षणांची छायाचित्रे काढून आठवणी जतन करता येणार आहेत. तसेच या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यक्रमांचीही जोड देण्यात आली असून, विविध मनोरंजक कार्यक्रमांचा आनंद उपस्थितांना घेता येणार आहे.




सावंतवाडीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या मोती तलावाच्या काठावर आयोजित करण्यात आलेला हा दीपोत्सव शहराच्या सौंदर्यात आणखी भर घालणार आहे. असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला तलाव परिसर आणि त्याला लाभलेली सांस्कृतिक कार्यक्रमांची साथ यामुळे हा सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे.




दीपावलीच्या निमित्ताने आयोजित या अनोख्या उपक्रमात सावंतवाडी शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि दीपोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.




प्रकाशाचा उत्सव, सांस्कृतिक परंपरेचा जागर आणि ऐतिहासिक मोती तलावाचे नयनरम्य सौंदर्य यांचा सुरेख संगम अनुभवण्याची संधी या दीपोत्सवाच्या माध्यमातून सावंताडीकरांना मिळणार आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT