जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

कुडाळमध्ये लवकरच साकार होणार जिल्हा भंडारी समाज भवनाचे स्वप्न! – पालकमंत्री नितेश राणे

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कुडाळमध्ये लवकरच साकार होणार जिल्हा भंडारी समाज भवनाचे स्वप्न! – पालकमंत्री नितेश राणे
“

शासकीय व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण; आठ ते पंधरा दिवसांत भूखंडाचा सातबारा होण्यासाठी प्रयत्न

कणकवली प्रतिनिधी✍️ : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज भवनासाठी शासन आणि प्रशासकीय स्तरावरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, लवकरच कुडाळ येथे भव्य भंडारी समाज भवनाचे स्वप्न साकार होणार आहे. पालकमंत्री झाल्यानंतर भंडारी समाजाचे नेते अतुल बंगे आणि समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे या भवनाची मागणी केली होती. त्यानुसार सातत्याने पाठपुरावा करून शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला यश आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.




सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा भंडारी समाजाचे अध्यक्ष हेमंत करगुटकर, देवगडचे बाळासाहेब खडपे, भंडारी समाजाचे नेते बाळ खडपे, वैभव करंगुटकर, सचिव हेमंत सावंत, गोपाळ रुमडे, विलास गोडकर यांच्यासह समाजाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




यावेळी बोलताना पालकमंत्री राणे म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त आणि महाराष्ट्र शासनाकडे भंडारी समाज भवनासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे. या कामासाठी जिल्हा प्रशासन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. समाज भवन उभारण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कोणतेही राजकारण न करता प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्याचे फलित आता भंडारी समाज भवनाच्या रूपाने मिळत आहे. येत्या आठ ते पंधरा दिवसांत या भूखंडाचा सातबारा उतारा मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे पाठपुरावा करत आहेत. यासाठी पालकमंत्री म्हणून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.




कुडाळ तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा भंडारी समाज भवन उभारण्यात यावे, अशी एकमुखी मागणी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार कुडाळ येथील शासकीय भूखंड मिळविण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी करून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर या प्रयत्नांना यश मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असल्याचे राणे यांनी सांगितले.




या मागणीसाठी कुडाळ तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष अतुल बंगे, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे कार्याध्यक्ष राजू गवंडे, ज्येष्ठ नेते मामा माडये, रमण वायंगणकर, सावंतवाडी भंडारी समाजाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, देवगडचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खडपे, मालवण तालुकाध्यक्ष रवी तळाशीलकर, कणकवलीचे निलेश गोवेकर, जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत करगुटकर, मालवणचे श्रीकांत वेंगुर्लेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मोहन गवंडे आणि वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विलास गडेकर यांनी विशेष पुढाकार घेतला होता.




यावेळी भंडारी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वागत करून समाज भवनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT