जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

खोदाईमुळे नवाबागचा पाणीपुरवठा ठप्प; शिवसेनेच्या हस्तक्षेपानंतर टँकरने पाणीपुरवठा सुरू!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

खोदाईमुळे नवाबागचा पाणीपुरवठा ठप्प; शिवसेनेच्या हस्तक्षेपानंतर टँकरने पाणीपुरवठा सुरू!
“

दिवाळीपर्यंत खोदाईचे काम बंद ठेवण्याची मागणी; नागरिकांना त्रास झाल्यास काम बंद पाडण्याचा शिवसेनेचा इशारा

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : उभादांडा येथील नवाबाग परिसरातील ग्रामस्थांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेचा पुरवठा अचानक बंद झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. याबाबत चौकशी केली असता, सुरू असलेल्या खोदाईच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद झाल्याचे समोर आले.




उभादांडा येथे भूमिगत वीजवाहिन्यांसाठी सुरू असलेल्या खोदाईदरम्यान गणपती मंदिराच्या दिशेने तब्बल तीन ठिकाणी पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे नवाबाग परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता.




ही बाब निदर्शनास येताच शिवसेना पदाधिकारी गणपत केळुसकर, प्रकाश मोटे आणि कार्मिस आल्मेडा यांनी सायंकाळी संबंधित ठेकेदाराशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या प्रकाराबाबत जाब विचारला. फुटलेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार नवाबाग परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.




दरम्यान, दिवाळी सण येऊन ठेपला असताना खोदाईच्या कामामुळे बागायत आणि नवाबाग परिसरातील ग्रामस्थांसह वाहनचालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे दिवाळी सण संपेपर्यंत खोदाईचे काम पूर्णपणे बंद ठेवावे, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. यासाठी संबंधित सुपरवायझरला प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी बोलावून त्याला स्पष्ट सूचना देण्यात आल्या.




सणासुदीच्या काळात नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने खोदाईचे काम सुरू ठेवल्यास ते काम शिवसेनेच्या वतीने बंद पाडण्यात येईल, असा ठाम इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.




शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे नवाबाग परिसरातील ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT