जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

महिला शेतकऱ्यांसाठी वेंगुर्ल्यात प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

महिला शेतकऱ्यांसाठी वेंगुर्ल्यात प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन
“

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ले नगरपरिषद व अनुलोम यांचा संयुक्त उपक्रम; नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते उद्घाटन

वेंगुर्ला स्वरूपा सौदागर ✍️ : महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले महिला शेतकरी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ले नगरपरिषद आणि अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.




हे शिबिर सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ले नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते होणार आहे.




महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन व सहकार्य मिळावे, तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.




या शिबिराचा परिसरातील महिला शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT