जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

माणगावच्या खारफुटी जमिनींचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे सरसावले

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

माणगावच्या खारफुटी जमिनींचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे सरसावले
“

शेतकरी प्रतिनिधींसोबत घेतली महत्त्वपूर्ण बैठक; न्याय मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरूच ठेवण्याची ग्वाही

कुडाळ प्रतिनिधी✍️: येथील खारफुटी अर्थात मॅंग्रोव्ह (आकारीपड) वनक्षेत्रातील जमिनींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा पाठपुराव्याला गती दिली आहे. या संदर्भात संबंधित जमिनीची मागणी करणाऱ्या शेतकरी प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यात आली.




बैठकीदरम्यान आमदार निलेश राणे यांनी शेतकरी प्रतिनिधींशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. खारफुटी वनक्षेत्रातील जमिनीचा प्रश्न शासनदरबारी सातत्याने मांडला जात असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण ठामपणे प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या संघर्षात खंबीरपणे साथ देण्याची भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.




माणगावमधील खारफुटी वनक्षेत्रातील जमिनीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना या प्रश्नातून दिलासा मिळावा आणि त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.




या बैठकीला शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तहसीलदार सचिन पाटील, आनंद शिरवलकर, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, नगरपंचायत सभापती मिलिंद नाईक, काका कुडाळकर, अरविंद करलकर, प्रकाश मोरे, मोहन सावंत, राजा धुरी, भाई बेळणेकर, दिलीप सावंत, विभागप्रमुख दिनेश शिंदे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.




दरम्यान, माणगावच्या खारफुटी जमिनींचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतल्याने संबंधित शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे. आता या प्रश्नावर शासन कोणता निर्णय घेते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना कधी न्याय मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT