सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : निरवशिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ; ग्रामस्थांना मिळणार मोठा दिलासाडे गावातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या चार रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्येतून दिलासा मिळणार आहे.
या अंतर्गत सावंतवाडी-शिरोडा रस्ता ते पलताडवाडी, पलताडवाडी ते बाईतवाडी, शिरोडा रस्ता ते विष्णुप्रसाद सोसायटी आणि भाईडवाडी ते शेटकरवाडी या चार रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. गावातील विविध वाड्यांना जोडणारे हे रस्ते महत्त्वाचे असल्याने त्यांच्या कामांना सुरुवात झाल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गावडे, ज्येष्ठ ग्रामस्थ लाडू गावडे, सुहास गावडे, सुभाष गावडे, नामदेव गावडे, नारायण माळकर, बाळा बाईत, उमाकांत गावडे, अक्षय गावडे, सूरज गावडे, साहिल परब, साबाजी गावडे, बादल गावडे यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच ही महत्त्वाची रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचे विशेष आभार मानले. या रस्त्यांच्या कामांमुळे निरवडे गावातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.