जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे सरसावले!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे सरसावले!
“

श्री सद्गुरू नारायण महाराज दिंडीचे यंदा ५१ वे वर्ष; दिंडीसोबतच्या साहित्य वाहतूक वाहनासाठी पोलीस व टोलनाका प्रशासनाला सहकार्याचे आवाहन

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : वेंगुर्ला येथील श्री सद्गुरू नारायण महाराज गुरुकुल आश्रमाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या श्री सद्गुरू नारायण महाराज पायी दिंडीचे यंदा ५१ वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर १० नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला येथून पंढरपूरच्या दिशेने दिंडी प्रस्थान करणार आहे. या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. दिंडीसोबत असलेल्या साहित्य वाहतूक वाहनाला प्रवासात आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी पोलीस आणि टोलनाका प्रशासनाला केले आहे.




या पायी दिंडीसोबत एमडब्ल्यूटी-९६०१ क्रमांकाचे टाटा एलपीटी वाहन असते. प्रमिला लक्ष्मण गंगावणे यांच्या मालकीच्या या वाहनातून वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी लागणारे साहित्य, दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच इतर आवश्यक सामग्रीची वाहतूक केली जाते. वारीदरम्यान वारकऱ्यांना गरजेच्या वस्तू वेळेवर उपलब्ध करून देण्याबरोबरच पायी चालून थकलेल्या ज्येष्ठ वारकऱ्यांना आवश्यकतेनुसार काही अंतरासाठी प्रवासाची सुविधाही या वाहनाच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे दिंडीच्या नियोजनात या वाहनाचे महत्त्वपूर्ण योगदान असते.




वारीदरम्यान मार्गावरील पोलीस तपासणी नाके आणि टोलनाक्यांवर वाहनांना थांबावे लागते. त्यामुळे दिंडीच्या प्रवासात अडथळे निर्माण होऊन वारकऱ्यांच्या सुविधांवर परिणाम होऊ नये, या उद्देशाने मंत्री नितेश राणे यांनी संबंधित पोलीस यंत्रणा आणि टोलनाका प्रशासनाला शिफारसपत्र दिले आहे. दिंडीसोबतच्या या वाहनाला प्रवासादरम्यान आवश्यक ते सहकार्य करावे आणि वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.




मंत्री नितेश राणे यांचे शिफारसपत्र भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी ह.भ.प. सावळाराम कुर्ले बुवा यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी किशोर रेवणकर, गजानन कुबल यांच्यासह वारकरी बांधव आणि भगिनी उपस्थित होते.




श्री सद्गुरू नारायण महाराज पायी दिंडीच्या माध्यमातून गेल्या पाच दशकांपासून वेंगुर्ला ते पंढरपूर असा भक्तिमय प्रवास अखंडपणे सुरू आहे. यंदा ५१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या दिंडीच्या प्रस्थानाची वारकरी आणि विठ्ठलभक्तांना उत्सुकता लागली आहे. विठ्ठलनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वातावरणात ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT