जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

सावंतवाडीत ‘वेदश्री मोटर ड्रायव्हिंग स्कूल’चा शुभारंभ; पहिल्या २५ प्रवेशार्थींना विशेष सवलत!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सावंतवाडीत ‘वेदश्री मोटर ड्रायव्हिंग स्कूल’चा शुभारंभ; पहिल्या २५ प्रवेशार्थींना विशेष सवलत!
“

जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत आणि नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : नागरिकांना वाहन चालविण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे आणि सुरक्षित वाहनचालना करण्याबाबत आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने सावंतवाडी शहरात ‘वेदश्री मोटर ड्रायव्हिंग स्कूल’ सुरू करण्यात आले आहे. या नवीन ड्रायव्हिंग स्कूलचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.




या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्या अपर्णा सातोसकर, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, न्हावेली सरपंच अंकित धाऊसकर, प्रशांत पोतदार, रामचंद्र देऊळकर, विकास तेंडुलकर, बाळू कानडे, आर्या धाऊसकर, आशिष धाऊसकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




‘योग्य प्रशिक्षण, सुरक्षित प्रवास!’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थींना वाहन चालविण्याचे शास्त्रशुद्ध धडे दिले जाणार आहेत. यासाठी सुसज्ज वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तरुण-तरुणी, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या शुल्कात वाहन चालविण्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे.




या ड्रायव्हिंग स्कूलच्या शुभारंभानिमित्त प्रवेश घेणाऱ्या पहिल्या २५ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्कात विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी लवकरात लवकर आगाऊ नोंदणी करावी, असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.




‘वेदश्री मोटर ड्रायव्हिंग स्कूल’ हे संजीवनी हॉस्पिटलजवळ, सालईवाडा, सावंतवाडी येथे सुरू करण्यात आले आहे. प्रवेश आणि अधिक माहितीसाठी ९४०५८२७५९९ किंवा ८७६७४७९५१६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT