जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या पुढाकारातून वनराई बंधारा

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या पुढाकारातून वनराई बंधारा
“

वन्यप्राण्यांसाठी ठरणार महत्त्वाचा पाणवठा

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली,विशाल परब व तुळस ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळस यांच्या पुढाकारातून श्री गोवर्धन मंदिर परिसरात वनराई बंधारा उभारण्यात आला.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा करण्यासोबतच भूजल पुनर्भरणास चालना मिळणार असून,परिसरातील वन्यप्राणी व पाळीव जनावरांसाठी पाण्याचा आधार निर्माण होणार आहे.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी स्थानिक पातळीवर अडवून जमिनीत मुरविणे हा या बंधाऱ्याचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी,जलस्रोत तसेच भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन आगामी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास हातभार लागणार आहे.

वन्यप्राण्यांसाठी ठरणार महत्त्वाचा पाणवठा

तुळस येथील श्री गोवर्धन मंदिर परिसरातील या पाणीसाठ्याचा वन्यप्राणी तसेच पाळीव जनावरांना लाभ होणार आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांच्या अधिवासाच्या जवळच पाण्याची उपलब्धता निर्माण करणे महत्त्वाचे आहे.त्यामुळे जलसंधारणासोबतच वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनेही या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गावागावांत स्थानिक पातळीवर अशा छोट्या जलसंधारण प्रकल्पांची उभारणी होणे गरजेचे आहे.तुळस येथे उभारण्यात आलेला हा वनराई बंधारा जलसंधारण,भूजल पुनर्भरण आणि वन्यजीव संवर्धनाचा समन्वय साधणारा उपक्रम ठरला आहे.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई,पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपनगराध्यक्ष सुहास गवडळकर, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ,तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच नारायण कुंभार, सदस्य जयवंत तुळसकर,सचिन नाईक,सदस्या चरित्रा परब,रतन कबरे व शिक्षक बबन घोडे पाटील उपस्थित होते.

तसेच वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळसचे अध्यक्ष डॉ. सचिन वासुदेव परुळकर,सचिव विवेक तिरोडकर यांच्यासह नाना राऊळ,महेश राऊळ,माधव तुळसकर,यशवंत राऊळ,निलेश राऊळ,रोहन राऊळ,सचिन राऊळ,प्रसाद भणगे,नाना सावळ,प्रदीप सावंत,संदीप गावडे,सदगुरू सावंत,सुधीर चुडजी,मंगेश सावंत,सुहास सावंत,सागर सावंत,प्रदीप परुळकर,प्रज्वल परुळकर, प्रमोद तांबोसकर,आनंद राऊळ, रोहित गडेकर,भूमी परुळकर व भार्गवी परुळकर तसेच उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे येथील रावे ग्रुप तुळसचे ओम कुंभार,अरिन मोंडे,धनंजय साळवी,सिद्धार्थ चौधरी,यशराज पाटील,अमित टोकसिया व दिनेश बिश्नोई यांनी श्रमदान केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT