जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

‘आदि अनंत’मधून कुडाळचा बालकलाकार आरव आईर गाजवणार मोठा पडदा

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

‘आदि अनंत’मधून कुडाळचा बालकलाकार आरव आईर गाजवणार मोठा पडदा
“

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका; १२ नोव्हेंबरला चित्रपट राज्यभर प्रदर्शित

कुडाळ प्रतिनिधी✍️: अभिनयाची आवड आणि मेहनतीच्या जोरावर बालवयातच मनोरंजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कुडाळच्या आरव सुरेश आईर याने आता मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ‘आदि अनंत’ या आगामी मराठी चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. येत्या १२ नोव्हेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. आरवच्या या यशामुळे कुडाळसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केले असून, दिग्दर्शनाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. आजोबा आणि नातू यांच्यातील प्रेम, आपुलकी आणि भावनिक नातेसंबंधांवर आधारित हृदयस्पर्शी कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अशोक सराफ, संकर्षण कऱ्हाडे, सखी गोखले, वैदेही परशुरामी, कविता लाड, श्रीरंग गोडबोले आणि गीतकार गुरु ठाकूर यांच्यासह अनेक नामवंत कलाकार चित्रपटात झळकणार आहेत. या कलाकारांसोबत अभिनय करण्याची संधी आरवला मिळाली आहे.


पिंगुळी येथील उत्कर्षनगरमध्ये राहणारा आरव सध्या कुडाळ हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिकत आहे. अवघ्या ११व्या वर्षी त्याने अभिनय क्षेत्रात विविध माध्यमांतून आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे. झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनिअर्स २०२४’ या रिअॅलिटी शोमध्ये त्याने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तसेच झी चित्र गौरव सोहळ्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत अभिनय सादर करण्याची संधीही त्याला मिळाली होती.


‘मुंजा’, ‘सोरट’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांमध्ये आरवने भूमिका साकारल्या आहेत. सन मराठीवरील ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ या मालिकेतील ‘दिघ्या’ या भूमिकेमुळे त्याला विशेष ओळख मिळाली. ‘विण दोघातली ही तुटेना’ या मालिकेच्या गणपती विशेष भागात त्याने ‘गणू’ची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘अंधारमाया’, ‘अथांग’ आणि ‘कल्की’ या वेबसीरिज, विविध लघुपट आणि व्हिडिओ अल्बममधूनही त्याने अभिनयाची छाप उमटवली आहे.


रंगभूमीवरही आरवने आपल्या अभिनयकौशल्याची चुणूक दाखवली आहे. ‘धीम टॅंक डिटॅंग’ या एकांकिकेतील ‘गोपी’च्या भूमिकेसाठी अटल करंडक एकांकिका स्पर्धा २०२३ मध्ये त्याला उत्कृष्ट बालकलाकाराचा प्रथम पुरस्कार मिळाला. अहमदनगर करंडक स्पर्धेत लक्षवेधी बालकलाकार पुरस्काराने त्याचा गौरव झाला. ‘सिंड्रेला’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार, तर ‘केकी’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार त्याने पटकावला आहे. याशिवाय विविध राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय नृत्य व अभिनय स्पर्धांमध्येही त्याने पारितोषिके मिळवली आहेत.


चित्रपट, मालिका, वेबसीरिज, लघुपट आणि नाट्य अशा विविध क्षेत्रांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या आरवच्या कारकिर्दीत ‘आदि अनंत’ हा चित्रपट नवा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. ज्येष्ठ कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाल्याने त्याच्या पुढील कलाप्रवासाबाबत अपेक्षा व्यक्त होत आहेत. आरवच्या या यशामुळे कुडाळच्या कलाक्षेत्रातही आनंदाचे वातावरण आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!
प्रशासन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक
सांस्कृतिक

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक

११२ भजन मंडळांचा निधी अखर्चित राहून परत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन!
सामाजिक

११२ भजन मंडळांचा निधी अखर्चित राहून परत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन!

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
सामाजिक

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

ANCHOR AD SLOT