जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

बुके ना पोस्टर बळीराजाच्या सक्षमीकरणासाठी योगदान विशाल परब

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

बुके ना पोस्टर बळीराजाच्या सक्षमीकरणासाठी योगदान विशाल परब
“

वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभेत आरोग्याच्या सुविधा देत मतदारांचे आशीर्वाद घेतले

वेंगुर्ला प्रतिनिधी ✍️: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाने सप्टेंबर महिन्यात सेवा अभियान राबविण्यात आले. त्याच उपक्रमशीलतेचा पुढील टप्पा म्हणून विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरे आणि लोक सहभागातून कच्चे बंधारे उभारण्याचा संकल्प प्रत्यक्ष साकार होत आहे.

वाढदिवस म्हटला की शुभेच्छांचा वर्षाव, सत्कार, बुके आणि पोस्टरची झगमगाटी सजावट... मात्र या पारंपरिक चौकटीला छेद देत ‘ना बुके, ना पोस्टर; बळीराजाच्या सक्षमीकरणासाठी योगदान!’ असा संदेश देत भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आरोग्यसेवा आणि जलसंधारणाला प्राधान्य देणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

आरोग्यसेवेचा ‘महासंकल्प’- म्हापण येथील महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद -

जलसंधारणाबरोबरच ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विविध जिल्हा परिषद मतदारसंघांत महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. आज म्हापण येथील महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी सभापती निलेश सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा सिंधुदुर्ग व वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने शिबिर संपन्न झाले असून म्हापण दशक्रोषीतील हजारो नागरिकांना त्याचा लाभ घेतला. ‘वाढदिवस’ नाही, तर ‘सेवेचा उत्सव’ वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याच माध्यमातून समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी विधायक काम उभे करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. ‘बुकेऐवजी बंधारा आणि पोस्टरऐवजी आरोग्यसेवा’ या संकल्पनेतून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्याचा युवा नेते विशाल परब यांच्या उपक्रमाला समाजातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यावेळी व्यासपीठावर युवा नेते विशाल परब यांच्यासह माजी सभापती निलेश सामंत, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आरोग्य सभापती विकास गवंडे, प्रसन्न देसाई, माजी सरपंच तथा सदस्य गुरुनाथ मडवळ,निकित राऊळ, पाट सरपंच साधना परब, बाबल गवंडे, सुदेश किनवडेकर, सुधीर ठाकूर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे
सामाजिक

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!
प्रशासन

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!
प्रशासन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक
सांस्कृतिक

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक

ANCHOR AD SLOT