जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

गुहागरच्या एमआयडीसीचा वनवास संपणार! रद्द झालेल्या प्रकल्पाला पुन्हा हिरवा कंदील

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

गुहागरच्या एमआयडीसीचा वनवास संपणार! रद्द झालेल्या प्रकल्पाला पुन्हा हिरवा कंदील
“

भास्कर जाधव सुचवतील त्या ठिकाणी १०० एकरांत औद्योगिक वसाहत; उद्योगमंत्री उदय सामंत यांची तत्त्वतः मंजुरी

रत्नागिरी प्रतिनिधी✍️ : गुहागर विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या औद्योगिक विकासाच्या प्रश्नाला अखेर पुन्हा चालना मिळाली आहे. यापूर्वी शासनाकडून रद्द करण्यात आलेल्या एमआयडीसीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने नव्याने मान्यता देण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाणे येथे झालेल्या बैठकीत गुहागरमधील नव्या एमआयडीसीला तत्त्वतः मंजुरी दिली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव सुचवतील त्या ठिकाणी १०० एकर जागेत औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.




गुहागर आणि चिपळूण तालुक्यांच्या सीमाभागातील १४ गावांमध्ये औद्योगिक प्रकल्प उभारून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने सुमारे १५ वर्षांपूर्वी तत्कालीन राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी एमआयडीसी मंजूर करून घेतली होती. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी रखडली. त्यातच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने अचानक ही एमआयडीसी रद्द केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या निर्णयाचा मोठा राजकीय फटकाही आमदार भास्कर जाधव यांना बसला होता.




आता नव्या निर्णयामुळे या प्रकल्पाच्या पुनर्उभारणीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भास्कर जाधव यांनी सुचविलेल्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रासाठी सलग १०० एकर जमीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिले आहेत. प्रकल्पाच्या कामकाजात प्रशासकीय अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी एकखिडकी योजना राबविण्याबाबतही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.




या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रांताधिकारी आकाश लीगाडे यांना आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे गुहागरमधील रखडलेल्या एमआयडीसीच्या विषयाला आता नव्याने गती मिळण्याची चिन्हे आहेत.




प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र प्रत्यक्षात साकारल्यास गुहागर आणि चिपळूण तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील १४ गावांच्या विकासाला चालना मिळू शकते. स्थानिक तरुणांना रोजगारासाठी अन्य शहरांकडे स्थलांतर करण्याऐवजी आपल्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे या एमआयडीसीच्या पुढील प्रशासकीय प्रक्रियेकडे आता स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

जिल्हाधिकारी पाणथळ संरक्षण समितीचे अध्यक्ष असून देखील पिंगुळी पाझर तलाव पाणथळ क्षेत्रातील उल्लंघनाकडे दुर्लक्ष का करत आहेत मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल
राजकीय

जिल्हाधिकारी पाणथळ संरक्षण समितीचे अध्यक्ष असून देखील पिंगुळी पाझर तलाव पाणथळ क्षेत्रातील उल्लंघनाकडे दुर्लक्ष का करत आहेत मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल

युनियन बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अविनाश पराडकर यांचे निधन
सामाजिक

युनियन बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अविनाश पराडकर यांचे निधन

मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको; उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह १२० जणांवर गुन्हा
राजकीय

मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको; उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह १२० जणांवर गुन्हा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजन
प्रशासन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजन

ANCHOR AD SLOT