कुडाळ प्रतिनिधी✍️ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी नेरूर जिल्हा परिषद विभागातील कवठी, चेंदवण, वालावल आणि हुमरमळा या गावांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत गावातील विविध समस्या, विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांचा आढावा घेतला. त्यांच्या या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून यापूर्वी गावांमध्ये विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला होता. त्यातून झालेल्या विकासकामांबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच गावाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत प्रत्येक गावाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन वैभव नाईक यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांच्या अनेक घोषणा करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात ही कामे अद्याप मार्गी लागलेली नाहीत, अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. विशेषतः नेरूर-कवठी-चेंदवण हा मुख्य रस्ता ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे अत्यंत खराब व धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यावेळी वैभव नाईक यांनी ग्रामस्थांचे प्रश्न व अडचणी जाणून घेतल्या.
याच दौऱ्यादरम्यान युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने चेंदवण युवासेना शाखाप्रमुखपदी नारायण तोरसकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना माजी आमदार वैभव नाईक म्हणाले की, "आज मी आमदार नसलो तरी जनसेवेच्या कामात कधीही खंड पडू दिलेला नाही. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने, मोर्चे आणि विविध माध्यमांतून सातत्याने आवाज उठवत आलो आहे. यापुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी आपला संघर्ष सुरूच राहील."
सध्याच्या लोकप्रतिनिधींवर टीका करताना ते म्हणाले की, लोकप्रतिनिधींकडून केवळ स्वतःच्या फायद्याची कामे मंजूर करून घेतली जात असून, टक्केवारीच्या उद्देशाने ती आपल्या मर्जीतील ठेकेदारांना दिली जात आहेत. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील जनतेला नको असलेले विनाशकारी प्रकल्प सत्ताधाऱ्यांकडून आणले जात असून परप्रांतीयांना जिल्ह्यातील जमिनी मिळवून दिल्या जात आहेत. सत्ताधाऱ्यांचे अभय असल्यामुळेच परप्रांतीयांकडून स्थानिकांशी अरेरावी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अदानीचे स्मार्ट मीटर जनतेच्या माथी मारले जात असून दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. सरकारचा धाक नसल्याने गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांमध्ये वाढ होत आहे. या सर्व प्रश्नांवर प्रत्येक शिवसैनिकाने जनतेच्या बाजूने ठामपणे आवाज उठविण्याची गरज आहे. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे, असा विश्वासही वैभव नाईक यांनी ग्रामस्थांना दिला.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
हुमरमळा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, पंचायत समिती सदस्य अर्चना बंगे, कुडाळ शिवसेना प्रवक्ते बाळा पावसकर, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, माजी सरपंच सुरेश वालावलकर, रमा गाळवणकर, स्नेहलदीप सामंत, शरद वालावलकर, सोनाली मांजरेकर, पंढरी गाळवणकर, नाथा राणे, भिवा गुंजकर, ग्रामपंचायत सदस्य संजना गुंजकर, हेमांगी कद्रेकर, सुमित परब, वैभव मांजरेकर, विजू पेडणेकर, अजित केसरकर, किशोर वालावलकर, पोलीस पाटील सुबोध सावंत, योगेश परब, जयसिंग मार्गी, सागर परब, प्रभाकर गुंजकर, शानो परकर, धनंजय परकर, पप्पू दळवी, युवासेना शाखाप्रमुख संदेश जाधव, रमा मांजरेकर, विजय वालावलकर आणि नामदेव परब उपस्थित होते.
कवठी येथे अरुण परुळेकर, दिलीप परुळेकर, एकनाथ बांदेकर, मंगेश बांदेकर, नंदकिशोर वाडयेकर, ममता वाडयेकर, संतोष वि. वाडयेकर, राजन खोबरेकर, संतोष प्र. वाडयेकर, रवी गोडकर, दीपक सांगळे, समीर बांदेकर, सिद्धिविनायक कवठकर, गणपत कवठकर, संजय खोबरेकर, कुणाल बांदेकर, रुपेश खडपकर, महेश भा. वाडयेकर, मधुकर खडपकर, अशोक खडपकर, महेश दि. वाडयेकर, गजानन व. कवठकर आणि गजानन म. कवठकर उपस्थित होते.
चेंदवण येथे केशव पिळणकर, अंकुश तोरसकर, शंकर जामसाडेकर, रवी तोरसकर, अनंत पिळणकर, रेवती तोरसकर, मदन तोरसकर, भावेश तोरसकर, ओमकार पिळणकर, सगुण तोरसकर, सत्यविजय तोरसकर आणि सवैश तोरसकर उपस्थित होते.
वालावल येथे पूजा राऊळ, शाखाप्रमुख सुनील करवडकर, हेमंत वालावलकर, रवींद्र कावळे, गोविंद पेडणेकर, प्रमोद आडेकर, सागर तेली, राजन वालावलकर, सुनील आडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.