जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

‘गोकुळ’च्या संघर्ष मोर्चाला मनसेचा ठाम पाठिंबा!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

‘गोकुळ’च्या संघर्ष मोर्चाला मनसेचा ठाम पाठिंबा!
“

राज ठाकरे यांचा सतेज पाटील यांना पाठिंबा; ९ नोव्हेंबरला कोल्हापुरातील दसरा चौकात मनसे सैनिक उतरणार

कोल्हापूर प्रतिनिधी✍️ : ‘गोकुळ’ दूध संघाच्या संदर्भात आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी आयोजित केलेल्या संघर्ष मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाने आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा अधिकृत निर्णय घेतला असून, या मोर्चात मनसेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.




सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथून या संघर्ष मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात मनसेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि नंदकुमार चिले हेदेखील सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.




या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे प्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांना मोर्चात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘गोकुळमध्ये आम्ही तुमच्या बरोबर!’ अशी भूमिका घेत आमदार सतेज पाटील यांच्या संघर्षाला पाठिंबा दिल्याने या मोर्चात मनसेची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




मनसेचे हातकणंगले लोकसभा जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील आणि जिल्हा सचिव प्रतापराव पाटील यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी ठीक १० वाजता दसरा चौक येथे वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

नरडवे इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीसाठी सावंत कुटुंबाकडून दोन लाखांची देणगी
सामाजिक

नरडवे इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीसाठी सावंत कुटुंबाकडून दोन लाखांची देणगी

सावंतवाडीत एकाच विकासकामाचे एकाच दिवशी दोनदा भूमिपूजन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
सामाजिक

सावंतवाडीत एकाच विकासकामाचे एकाच दिवशी दोनदा भूमिपूजन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६ जाहीर; शेतकऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान
प्रशासन

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६ जाहीर; शेतकऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान

ANCHOR AD SLOT