जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची १५ नोव्हेंबरची परीक्षा पुढे ढकलली!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची १५ नोव्हेंबरची परीक्षा पुढे ढकलली!
“

आता १७ जानेवारी २०२७ रोजी लेखी परीक्षा; शासनाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर

सिंधुदुर्गनगरी✍️ : कोकण व नाशिक विभागातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीसाठी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १२ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, ही परीक्षा आता १७ जानेवारी २०२७ रोजी घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.




सामान्य प्रशासन विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरती प्रक्रियेसाठी देण्यात आलेली वयोमर्यादेतील शिथिलता महसूल सेवक पदभरतीस लागू करण्याबाबत शासन स्तरावर सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच, राज्यातील अन्य महसुली विभागांमध्ये निवडणूक आचारसंहितेमुळे स्थगित झालेल्या आणि कोकण विभागातील पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा एकाच वेळी घेण्याच्या दृष्टीने सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.




या वेळापत्रकानुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजीच्या रिक्त पदांच्या स्थितीनुसार २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान तालुकानिहाय रिक्त जागांची यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर १ ते १५ डिसेंबर या कालावधीत रिक्त जागांनुसार बिंदुनामावली तयार करण्यात येईल. १५ डिसेंबर रोजी परीक्षा भरती समिती स्थापन केली जाणार असून, १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.




१ ते ७ जानेवारी २०२७ या कालावधीत प्राप्त अर्जांची छाननी केली जाईल. पात्र उमेदवारांना ८ ते १५ जानेवारीदरम्यान प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर १७ जानेवारी रोजी लेखी परीक्षा होईल. १८ जानेवारी रोजी उत्तरसूची व निकाल जाहीर केला जाणार असून, १८ ते २५ जानेवारीदरम्यान कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. तर २६ जानेवारी २०२७ रोजी अंतिम नियुक्तीपत्रे निर्गमित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.




दरम्यान, महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीसाठी इच्छुक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी परीक्षा होणार नसल्याची नोंद घ्यावी. तसेच, भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार तयारी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

नरडवे इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीसाठी सावंत कुटुंबाकडून दोन लाखांची देणगी
सामाजिक

नरडवे इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीसाठी सावंत कुटुंबाकडून दोन लाखांची देणगी

सावंतवाडीत एकाच विकासकामाचे एकाच दिवशी दोनदा भूमिपूजन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
सामाजिक

सावंतवाडीत एकाच विकासकामाचे एकाच दिवशी दोनदा भूमिपूजन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६ जाहीर; शेतकऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान
प्रशासन

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६ जाहीर; शेतकऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
सामाजिक

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

ANCHOR AD SLOT