जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाखांची आर्थिक मदत

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाखांची आर्थिक मदत
“

सैनिक कल्याण विभागाच्या कल्याणकारी निधीतून स्वप्नील सावंत यांना मदत

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी ✍️ : माजी सैनिकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या कल्याणकारी निधी योजनेअंतर्गत परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकाच्या पाल्याला एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.




सावंतवाडी तालुक्यातील सबनीसवाडा येथील माजी सैनिक संतोष मेघश्याम सावंत यांचा मुलगा स्वप्नील सावंत हा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये रशियातील Kemerovo State University, Kemerovo येथे एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. त्याच्या परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी सैनिक कल्याण विभागाच्या कल्याणकारी निधी योजनेतून एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.




या मंजूर आर्थिक मदतीचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते माजी सैनिक संतोष सावंत यांना प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रभारी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण कोळी तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.




सैनिक कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक तसेच त्यांचे अनाथ पाल्य आणि अवलंबित यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना शैक्षणिक मदतीसोबतच स्वयंरोजगार आणि पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.




जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी सैनिक कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.




या योजनांबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ०२३६२-२२८८२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT