देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे भाजपा युवा नेते विशाल परब व सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी बूथ क्रमांक १५१ मधील माजी नगरसेवक विलास जाधव यांच्या निवासस्थानी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत सामूहिक श्रवण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून मांडलेले राष्ट्रविकासाचे विचार, विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी कार्य आणि सामाजिक संदेश यावेळी उपस्थितांनी उत्साहाने ऐकले.
याप्रसंगी भाजपा युवा नेते विशाल परब, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव जाधव, बूथ अध्यक्ष सचिन माडये, माजी बूथ अध्यक्ष भूषण नाईक, स्वप्नील जाधव आणि बाबूराव तेली आदी उपस्थित होते.