जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत सिंधुदुर्गात ९५.५३ टक्के बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत सिंधुदुर्गात ९५.५३ टक्के बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप
“

१ लाख १० हजार ३४४ बालकांना अल्बेंडाझोल; पावशी शाळेत आरोग्य व शिक्षण समिती सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांची पाहणी

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेल्या मोहिमेत १ लाख १० हजार ३४४ बालकांना अल्बेंडाझोल जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात मोहिमेची एकूण ९५.५३ टक्के कामगिरी नोंदविण्यात आली असून, मोहिमेदरम्यान कोणतीही प्रतिकूल घटना (AEFI) घडल्याची नोंद झालेली नाही.




मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती प्रितेश राऊळ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पावशी क्रमांक १ येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मोहिमेच्या नियोजनासह प्रत्यक्ष कार्यवाहीची माहिती घेतली तसेच आवश्यक सूचना संबंधितांना दिल्या.




जिल्ह्यातील पात्र बालकांना जंतनाशक गोळ्यांचा लाभ मिळावा, यासाठी आरोग्य, शिक्षण तसेच महिला व बालविकास विभागातील अधिकारी-कर्मचारी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनी समन्वयाने काम केले.




कणकवली तालुका आघाडीवर




तालुकानिहाय कामगिरीचा विचार करता कणकवली तालुक्याने सर्वाधिक ११३.९७ टक्के कामगिरी नोंदविली आहे. त्यापाठोपाठ दोडामार्ग १०८.४८ टक्के, कुडाळ ९६.११ टक्के, सावंतवाडी ९०.७८ टक्के, मालवण ८८.८६ टक्के, देवगड ८८.५३ टक्के, वैभववाडी ८५.६३ टक्के आणि वेंगुर्ला तालुक्याने ८३.६३ टक्के कामगिरी केली आहे.




मोहिमेत जिल्ह्यातील ५३ हजार ७०१ मुली आणि ५६ हजार ६४१ मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.




३ नोव्हेंबरला मॉप-अप दिन




मोहिमेदरम्यान ज्या पात्र बालकांना जंतनाशक गोळ्या मिळालेल्या नाहीत, अशा बालकांसाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी संबंधित पात्र बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना गोळ्यांचा लाभ मिळाला आहे की नाही, याची खात्री करून आवश्यक असल्यास शिक्षक, अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.




बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, जंतसंसर्गाचा धोका कमी करणे आणि निरोगी बालपण सुनिश्चित करणे हा राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि महिला व बालविकास विभागांसह शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि पालकांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

बाळासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान करणाऱ्यांनी आधी त्यांच्या विचारांचा आदर करावा  साक्षी वंजारी
राजकीय

बाळासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान करणाऱ्यांनी आधी त्यांच्या विचारांचा आदर करावा साक्षी वंजारी

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!
प्रशासन

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार
राजकीय

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे
सामाजिक

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे

ANCHOR AD SLOT