जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

सावंतवाडीत जिल्हास्तरीय करा ओके गायन स्पर्धेत जयेश जाधव प्रथम

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सावंतवाडीत जिल्हास्तरीय करा ओके गायन स्पर्धेत जयेश जाधव प्रथम
“

रविंद्र प्रभू ठरले उपविजेते!

सावंतवाडी प्रतिनिधी✍️: शहरातील माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदिरात सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेत जयेश जाधव यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील एकाहून एक सरस २२ गायक-गायिकांनी भाग घेतला होता.

या रंगतदार स्पर्धेत जयेश जाधव (स्पर्धक क्र.८) यांनी ‘सोचेंगे तुम्हें प्यार करे के नही...’ हे गाणे सादर करत ३०० पैकी २३३ गुण मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले.तर रविंद्र प्रभू (स्पर्धक क्र. १४) यांनी ‘तेरे आँखों के सिवा दुनिया मे रखा क्या है...’ या गाण्यावर २३२ गुण मिळवत उपविजेतेपद पटकावले.तसेच प्रशांत हळदणकर (स्पर्धक क्र. ५) यांनी ‘चेहरा है या चाँद खिला...’ हे गाणे गाऊन २१२ गुणांसह तृतीय क्रमांक हासिल केला.

स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु. सानिका सासोलकर (स्पर्धक क्र. ९ - 'मेरे ख्वाबों में जो आये', २११ गुण) हिला,तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नेत्रा हर्षल भांगले (स्पर्धक क्र.१२ - 'बाबुजी धीरे चलना',२०५ गुण) हिने पटकावले.सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सम्राट क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे यांच्या हस्ते पार पडले. 

याप्रसंगी हरिश्चंद्र पवार, प्रतिभा चव्हाण,कौस्तुभ पेडणेकर,डॉ.सोनल लेले, गुरुप्रसाद चिटणीस,माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर गावडे,संतोष सावंत, दिलीप सांगावकर,बबलू मिशाळ तसेच वैभव केंकरे अमिषा सासोलकर लक्ष्मीकांत सासोलकर यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सैनिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन झाले.खुल्या गटातील अंतिम फेरीत दाखल झालेल्या सर्वच स्पर्धकांनी आपल्या गायन कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करत रसिकांची दाद मिळवली.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संगीत विशारद ॲड.सिद्धी परब,सौ.स्मिता केंकरे आणि कु श्रुती सावंत यांनी काम पाहिले. 

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आणि आभार गुरुप्रसाद चिटणीस यांनी केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!
प्रशासन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक
सांस्कृतिक

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक

११२ भजन मंडळांचा निधी अखर्चित राहून परत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन!
सामाजिक

११२ भजन मंडळांचा निधी अखर्चित राहून परत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन!

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
सामाजिक

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

ANCHOR AD SLOT