जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

तंबाखूजन्य पदार्थांवरील कारवाईतील अनियमितता; अन्न व औषध प्रशासनाच्या चार अधिकाऱ्यांचे निलंबन

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

तंबाखूजन्य पदार्थांवरील कारवाईतील अनियमितता; अन्न व औषध प्रशासनाच्या चार अधिकाऱ्यांचे निलंबन
“

अन्य २१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी; ठाणे व मावळमधील दोन कारवायांच्या अनुषंगाने शासनाची कार्यवाही

मुंबई प्रतिनिधी✍️: प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधातील कारवाईमध्ये झालेल्या कथित अनियमिततेची गंभीर दखल घेत राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनातील चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच अन्य २१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. ठाण्यातील मेसर्स हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी आणि मावळ तालुक्यातील मेसर्स सोएक्स इंडिया प्रा. लि. या दोन कंपन्यांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.




अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या चौकशीनंतर अन्न सह आयुक्त दिगंबर भोगावडे, अन्न सहायक आयुक्त यदुराज दहातोंडे, अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर आणि सी. आर. स्वामी या चार अधिकाऱ्यांना ३० ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ अंतर्गत त्यांच्याविरुद्ध पुढील विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.




ठाण्यातील हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी प्रकरणात संबंधित उत्पादनावर ‘नॉट फॉर एडिबल यूज/ओन्ली फॉर यूज इन हुक्का फॉर स्मोकिंग पर्पज’ असा स्पष्ट उल्लेख असतानाही अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. या कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आल्याचा, तसेच कारवाई करण्यास नकार देणारे सहायक आयुक्त पी. पी. सूर्यवंशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचा उल्लेख चौकशी अहवालात करण्यात आला आहे.




दरम्यान, मावळ तालुक्यातील टाकवे येथील मेसर्स सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीवर २ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आलेल्या कारवाईत ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये किमतीचा आणि ५ लाख ४८ हजार ४८८ किलो वजनाचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर कंपनीचे आस्थापन सील करण्यात आले होते.




या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी बजावलेली भूमिका, करण्यात आलेल्या कारवाईची कायदेशीर वैधता, अधिकारक्षेत्र तसेच प्रशासकीय प्रक्रियेचे पालन झाले की नाही, याची विभागीय चौकशीद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कारवाई करताना कायदेशीर तरतुदींचे पालन आणि प्रशासकीय उत्तरदायित्वाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!
प्रशासन

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार
राजकीय

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे
सामाजिक

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!
प्रशासन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!

ANCHOR AD SLOT