जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त NCMC कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त NCMC कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
“

कुंभारटेम मित्र मंडळ तुळस यांनी सामाजिक उपक्रम राबविला

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त कुंभारटेम मित्र मंडळ, तुळस वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री शारदा विद्यालय, तुळस येथे NCMC कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ८० नागरिकांनी NCMC कार्डचा लाभ घेतला.नागरिकांना NCMC कार्ड काढण्यासाठी वेंगुर्ला येथे जावे लागू नये, तसेच त्यांचा वेळ वाचून स्थानिक पातळीवरच ही सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिला, शेतकरी व इतर नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेता आला. नागरिकांची गैरसोय टाळून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या उपयोगाचा उपक्रम राबविण्यात आल्याने या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कुंभारटेम्ब मित्र मंडळाने स्थानिक नागरिकांसाठी पुढाकार घेतल्याने अनेकांना एकाच ठिकाणी कार्डसंबंधी सुविधा मिळाली.

“विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या उपयोगाचा उपक्रम राबविता आला, याचा आनंद आहे. नागरिकांना विविध शासकीय व सार्वजनिक सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी असे सामाजिक उपक्रम यापुढेही राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील,” अशी भावना उपसरपंच नारायण कुंभार यांनी व्यक्त केली. शिबिराच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचे कुंभारटेम मित्र मंडळ, तुळस यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे
सामाजिक

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!
प्रशासन

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!
प्रशासन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक
सांस्कृतिक

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक

ANCHOR AD SLOT