जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

विधानभवन येथे ससूनडॉक आणि तेथील मच्छिमार संघटना यांच्या अडीअडचणी संदर्भात झाली बैठक

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

विधानभवन येथे ससूनडॉक आणि तेथील मच्छिमार संघटना यांच्या अडीअडचणी संदर्भात झाली बैठक
“

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर व मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे उपस्थित

मुंबई पोर्ट ट्रस्टकडील जागा केंद्र शासनाकडून राज्यशासनाकडे शासन दराने हस्तांतरित करून मच्छीमारांना परवडणाऱ्या दरात गोदामे उपलब्ध करून देण्यासाठी अनुदानाचा पर्याय स्वीकारण्यात येईल. त्यासाठी सध्याच्या गोदामधारकांची माहिती घेऊन प्राधान्यक्रम निश्चित करणारे धोरण व प्रस्ताव तयार करावा,असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानभवन येथे ससूनडॉक आणि तेथील मच्छिमार संघटना यांच्या अडीअडचणी संदर्भात झालेल्या बैठकीत दिले.

यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, मत्स्यव्यवसाय सचिव.एन रामास्वामी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले मुंबई पोर्ट ट्रस्टचे खासगी संस्थांसाठी आणि शासकीय संस्थांसाठीचे भाडेदर वेगवेगळे आहेत. त्यामुळे राज्य शासनाने शासन ते शासन दराने जागा स्वीकारल्यानंतर मच्छीमारांना ती सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घ्यावी. यासंदर्भात महिना ते दीड महिन्यात पुन्हा आढावा घेण्यात येईल. ससून डॉकमधील बर्फ कारखाना, जलशुद्धीकरण प्रकल्प, मलनिस्सारण व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच पाणी व डिझेल वाहिन्यांसह विविध विकासकामांचे एकात्मिक नियोजन करावे. अपूर्ण कामे, बंद असलेल्या सुविधा आणि वापराविना पडलेल्या यंत्रसामग्रीमुळे निधी वाया जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले की, ससून डॉक येथील गोडाऊन इकोसिस्टिम साठी महत्वाचे आहे. पुढील आठवड्यात ससून डॉकची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक मच्छीमारांच्या सूचना जाणून घेऊन पाणीपुरवठा, मलनिस्सारण वाहिनी, रस्ते, लिलावगृह आणि अन्य विकासकामांसाठी निश्चित मुदतीचा कार्यक्रम तयार करण्यात येईल. ससून डॉकची जेट्टी १०० मीटरने वाढविण्याची गरज लक्षात घेऊन जुन्या व नव्या जेट्टीचे स्वामित्व आणि ताबा तपासावा. नवीन जेट्टी विस्ताराचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर गोदामे निधी उपलब्ध करुन देता येईल असे मंत्री श्री. राणे यांनी स्पष्ट केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा
सामाजिक

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
सामाजिक

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार
राजकीय

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

ANCHOR AD SLOT