जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियानात निवृत्तीवेतनधारकांनी सहभागी व्हावे!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियानात निवृत्तीवेतनधारकांनी सहभागी व्हावे!
“

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन; १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान तालुकानिहाय मेळाव्यांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी✍️ : जिल्ह्यातील सर्व कोषागार निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपले निवृत्तीवेतन नियमित सुरू राहण्यासाठी आवश्यक असलेला हयातीचा दाखला ‘जीवन प्रमाण’ ॲपच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात सादर करावा. देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान ५ जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.




कार्मिक, लोकशिकायत व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे. निवृत्तीवेतन अखंडित सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असते. यंदा ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर व्हावी, यासाठी डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे.




निवृत्तीवेतनधारकांना ‘जीवन प्रमाण’ ॲपचा वापर करून घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. याशिवाय, ज्या बँकेच्या शाखेतून निवृत्तीवेतन मिळते त्या शाखेत, जिल्हा कोषागार कार्यालयात किंवा संबंधित उपकोषागार कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीनेही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.




डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करताना लाभार्थ्यांनी आपले नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि पीपीओ क्रमांक अचूक नोंदविणे आवश्यक आहे. तसेच वितरण संस्था व कोषागार निवडताना ‘Maharashtra State Treasury’ आणि संबंधित कोषागार म्हणून ‘Sindhudurg DTO’ अर्थात जिल्हा कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग यांचीच निवड झाल्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




तालुकानिहाय मेळाव्यांचे आयोजन




डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, उपकोषागार कार्यालये, विविध बँका तसेच जिल्हा व तालुका पेन्शनर संघटनांच्या समन्वयातून १६ ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तालुकास्तरावर विशेष मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.




या मेळाव्यांना १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी आणि कणकवली येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखांमध्ये सुरुवात होणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी मालवण व कुडाळ, १८ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला व देवगड येथे मेळावे होणार आहेत. तर १९ नोव्हेंबर रोजी वैभववाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दोडामार्ग तालुक्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी साटेली-भेडशी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून विशेष मेळावा होणार आहे.




आवश्यक कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन




जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी संबंधित मेळाव्याला उपस्थित राहताना पीपीओ क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.




डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भात अधिक माहिती किंवा तांत्रिक मदतीची आवश्यकता असल्यास जिल्हा कोषागार कार्यालय, संबंधित तालुक्यातील उपकोषागार कार्यालय अथवा आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा.




दरम्यान, शासनाच्या ‘चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार’ या उद्दिष्टालाही या अभियानामुळे चालना मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र वेळेत सादर करावे आणि देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान ५ शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
प्रशासन

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

ANCHOR AD SLOT