जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

महिला व बालकांकडे दयेच्या भावनेने नव्हे, तर सन्मानाने पाहून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी सहकार्य करावे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) प्रतिभा वराळे

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

महिला व बालकांकडे दयेच्या भावनेने नव्हे, तर सन्मानाने पाहून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी सहकार्य करावे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) प्रतिभा वराळे
“

सर्वांनी संवेदनशीलतेने पुढाकार घेणे आवश्यक

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: अनाथ, निराधार आणि संकटग्रस्त बालकांना सुरक्षित वातावरण, शिक्षण व संगोपन उपलब्ध करून देणे, तसेच अन्यायग्रस्त व संकटात सापडलेल्या महिलांना आधार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी देणे, हे समाजाचे महत्त्वाचे दायित्व आहे. अशा महिला व बालकांकडे दयेच्या भावनेने नव्हे, तर सन्मानाने पाहून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी समाजाने सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) प्रतिभा वराळे यांनी केले.

जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची माहिती देताना शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बालगृह, ओरोस आणि शासकीय अंकुर महिला वसतिगृह, सावंतवाडी यांच्या कार्याची माहिती दिली.

शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बालगृह, ओरोस

महिला व बाल विकास विभागामार्फत १९८४ पासून कार्यरत असलेली शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बालगृह, ओरोस ही संस्था ६ ते १८ वर्षे वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रित, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या तसेच विधिसंघर्षग्रस्त बालकांसाठी कार्य करते. या बालकांना सुरक्षित वातावरण, शिक्षण, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास आणि योग्य संस्कार उपलब्ध करून देणे, तसेच त्यांचे कुटुंब किंवा समाजामध्ये योग्य पुनर्वसन घडवून आणणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

शासकीय अंकुर महिला वसतिगृह, सावंतवाडी

शासकीय अंकुर महिला वसतिगृह, सावंतवाडी ही संस्था महिला व बाल विकास विभागामार्फत १९५८ पासून कार्यरत आहे. १८ ते ६० वर्षे वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रित, अन्यायपीडित आणि संकटग्रस्त महिलांना सुरक्षित निवारा, आवश्यक मार्गदर्शन, समुपदेशन आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून पुन्हा आत्मविश्वासाने उभे राहण्याची संधी या संस्थेमार्फत उपलब्ध करून दिली जाते.

समाजात कोणतीही महिला संकटाच्या वेळी एकटी पडू नये आणि कोणत्याही बालकाला आधारासाठी भटकावे लागू नये, यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्रत्येक महिला व बालकाला सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि स्वावलंबी जीवन जगण्याची संधी मिळावी, यासाठी समाजाने सहकार्य करावे. संकटात सापडलेल्या, अन्यायपीडित, निराधार व निराश्रित महिलांनी मदतीसाठी महिला हेल्पलाइन क्रमांक १८१ वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती वराळे यांनी केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!
प्रशासन

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करून निधी खर्चाचे नियोजन करा!
प्रशासन

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करून निधी खर्चाचे नियोजन करा!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे
सामाजिक

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे

ANCHOR AD SLOT