मालवण प्रतिनिधी✍️ मालवण तालुक्यातील हरिहरेश्वर मंदिर परिसरात असलेल्या घरात अजगर घुसला होता.तो अजगर जेरबंद करून नैसर्गिक अधिवसात सोडण्यात सर्पमित्र तेजस नार्वेकर व वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग चे सल्लागार सर्पमित्र तथा सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा यतीन खोत यांना यश आले असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला व अजगराला पकडल्याने कौतुक केले. त्या अजगराला जीवदान देऊन सुरक्षित ठिकाणी सोडले.स्थानिक रहिवाशी दामले कुटुंबाने शिल्पा खोत यांना जाणून करताच तात्काळ खोत यांनी प्रथम दर्शनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.कारण त्या पुढे म्हणाल्या की काही वेळेस अजगर समजून अति विषारी घोणस साप समजून लोक जवण जातात त्यामुळे काही तरी अनर्थ घडू ने यासाठी खोत घटनास्थळी तातडीने तत्परतेने विलंब न करता कोणत्याही प्रकारचा विचार न करता स्वतःच्या जीवाची परवा न करता घटनास्थळी काही मिनिटातच पोचले व प्रत्यक्ष पाहणी करून सुदैवाने तो अजगर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.तसेच त्यांनी सांगितले की सध्या चालू वातावरणातील होण्याऱ्या बदलमुळे सरपटणारे जीव बाहेर पाडण्यास कारणीभूत असल्याने अशावेळी रेस्क्यू आणि तुमच्या जवळच्या सर्पमित्रांना वेळेत बोलून पुढील होणारे काही अनर्थ टाळावेत असे आवाहनही वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग चे सल्लागार शिल्पा खोत यांनी केले आहे.
मालवण हरिहरेश्वर मंदिर शेजारी घरात घुसला अजगर
व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा
फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
“
वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग चे सल्लागार शिल्पा खोत यांची घटनास्थळी धाव
दादा सारंग
लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.
संबंधित बातम्या
एक टिप्पणी द्या
संबंधित बातम्या
सामाजिक
कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
सामाजिक
कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक
संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा
सामाजिक
११२ भजन मंडळांचा निधी अखर्चित राहून परत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन!